पहिला पाऊस आणि तू....

पहिला पाऊस आणि तू....

पहिल्या पाऊसात बर्फाचा गारा पडतात, त्या गारा जशा मातीत विरघळतात ना, तसंच माझ्यामध्ये विरघळणारी तू.....

स्वचंद आकाशामध्ये उडणार्या कोकिलेची कुहू कुहू, आणि त्या प्रमाणे गोड अशी हाक मारणारी तू....

दरवळणार्या मातीचा सुगंध, त्या सुगंधा सारख माझं आयुष्य सुखकर करणारी तू....

अंगावर पडणार्या थेंबातून तुझा स्पर्श जाणवून देणारी तू....

पहिला पाऊस जसा माती मधल्या बियांना रुजण्यासाठी उत्करशीत करतो, तसच माझा मधला आत्मविश्वास जागवून प्रेरणा देणारी तू....

पहिल्या पाऊसाची सर जशी, तशीच माझा आयुष्यात येणारी तू....

रिमझिम पाऊसाची, तसच माझ्यावर प्रेम बरसावणारी तू....

खूपच राग आला तर त्या विजे प्रमाणे माझ्यावर कडाडणारी तू....

दुःखाचं वादळ संपवून, सुखाचा गारवा आणणारी तू....

                          पहिला पाऊस आणि तू....
                                      _@myaaa...


Comments

Popular posts from this blog

Covid-19 - Who is responsible government, public or origin country

अशीच तू यावी

प्रेम तुझ माझ