#आयुष्याचं जगणं#

शब्द शब्द मनातले ओठांवर काही येईना,
भास भास मनाचा सुटता काही सुटेना....

वेळ वेळ त्या विचारांची संपता काही संपेना,
स्वप्न स्वप्न ते तुझे साथ माझी सोडेना...

श्वास श्वासामध्ये बसलय प्रेम हे तुझं,
आयुष्यभर पूराव म्हणून माझं....

मत मत ते आयुष्या बाबत नव अस काही नाही,
तेच ते जगणं, तुझं प्रेम, तुझा आठवणी आणि बरच काही....

प्रेम प्रेम ते आपलं शब्दामध्ये कस मांडू,
वेड्या माझा हृदयासोबत मी तरी आता किती भांडू.....

भांडण भांडण मनाची तर अशीच चालू असतात,
डोळे मात्र तुझी आतुरतेने वाट पाहत असतात.....

वाट वाट पाहण्यात तुझी डोळे कधी थकत नाहीत,
सवय झालीय म्हणून ते कधी तक्रार हि करत नाहीत....

तक्रार तक्रार करण्यासाठी माझ्याकडे आज कोणी नाही आहे,
दोन गोष्ठी येऊन हितगुज करणारा तुझा भास एवढंच उरलं आहे....

शेवटी उरून उरून उराव ते आपलं प्रेम असावं,
आणि हेच प्रेम, आयुष्याचं जगणं सोपं करावं.....
_amyaaa 

Comments

Popular posts from this blog

Covid-19 - Who is responsible government, public or origin country

अशीच तू यावी

प्रेम तुझ माझ