इतकच माझं आयुष्य उरावं ....

प्रेम, भावना, आपुलकी यात कधीच दूजाभाव नसावं
प्रेम एवढं करावं कि ते आयुष्यभर पुरावं....

आयुष्याचा खडतर प्रवासात साथ नेहमी तूच असावं
साउली बनून मी उन्हात माझ्यामध्ये तू विसावं....

लागताच तहान मला शीतल झरा बनून तू तहान भागवावं
आणि मग मी तुला प्रेमाने मिठीत घ्यावं....

लागताच ठेच मला तू पटकन धावत यावं
चुकून कधी अश्रू आले तर मी तुला हसवावं....

भासताच गरज मला तू सर्वात आधी हजार व्हावं
बघताच मन माझं तुला टकमक पाहावं....

कळत नाही कि आपल्या प्रेमा बद्दल आणखी काय लिहावं
लिहिण्यासारखं खूप आहे पण ते तुला कस कळावं....

कळत नाही एवढं आयुष्य मी एकट्याने कस काढावं
तू नाही आहेस सोबत तर मी कस जगावं....

शेवटी इच्छा एकच आहे....

मरण कधी आलं तर तुझं येण्यापर्यंत ते टळावं
कारण माझा शेवटचा श्वास अन तुझी घट्ट मिठी
इतकच माझं आयुष्य उरावं ....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रेम तुझ माझ

Covid-19 - Who is responsible government, public or origin country

# प्रेम #