Posts

#Janeman o meri Janeman#

Janeman o meri janeman Tu kya jane mera man Tujase pyar kare meri har dhadkan... Teri ek ek yade u ati hai Ankh meri ansuo se bhigo deti hai... Na kahi hai, jo tha teri bato me apnapan Janeman o meri janeman... Janeman o meri janeman Tu kya jane mera man Takta hai dil mera rah teri, sochta hai lout ayegi tu ess janam... Tukde tukde me bant gaya hai ab ye dil Jaise tute hue shishe me nazar aye vo har pal... Fir b lagta hai lout ayegi tu meri sanam Janeman o meri janeman...

#आयुष्याचं जगणं#

शब्द शब्द मनातले ओठांवर काही येईना, भास भास मनाचा सुटता काही सुटेना.... वेळ वेळ त्या विचारांची संपता काही संपेना, स्वप्न स्वप्न ते तुझे साथ माझी सोडेना... श्वास श्वासामध्ये बसलय प्रेम हे तुझं, आयुष्यभर पूराव म्हणून माझं.... मत मत ते आयुष्या बाबत नव अस काही नाही, तेच ते जगणं, तुझं प्रेम, तुझा आठवणी आणि बरच काही.... प्रेम प्रेम ते आपलं शब्दामध्ये कस मांडू, वेड्या माझा हृदयासोबत मी तरी आता किती भांडू..... भांडण भांडण मनाची तर अशीच चालू असतात, डोळे मात्र तुझी आतुरतेने वाट पाहत असतात..... वाट वाट पाहण्यात तुझी डोळे कधी थकत नाहीत, सवय झालीय म्हणून ते कधी तक्रार हि करत नाहीत.... तक्रार तक्रार करण्यासाठी माझ्याकडे आज कोणी नाही आहे, दोन गोष्ठी येऊन हितगुज करणारा तुझा भास एवढंच उरलं आहे.... शेवटी उरून उरून उराव ते आपलं प्रेम असावं, आणि हेच प्रेम, आयुष्याचं जगणं सोपं करावं..... _amyaaa 

माझ असच होत....

Image

अशीच तू यावी

Image
अशीच तू यावी अशीच तू यावी देऊन सर्व आठवणी मिठीत तू बिलगावी पहिले त्या स्वप्नी तुझाच ध्यास मणी ओघळताच अश्रू नयनी ना असे आस पास कोणी दूर ते क्षण झाले कष्ट खूप हृदयातले ना कोणास उमगले खरे प्रेम ते आपुले जगणे ते कसले ना तुझी ओढ तेथे प्रेम ते कसले ना तुझा उल्लेख तेथे एकदा तरी आयुष्यामध्ये तू .... मिळावी प्रेम त्या भावनांना पुन्हा एकदा कोमल  पालवी फुटावी पुन्हा एकदा घट्ट हाताची मिठी व्हावी माथ्यावर प्रेमाचा स्पर्श आणि हृदयात  काळजाची धकधक व्हावी अशीच तू यावी घेऊन सर्व आठवणी मिठीत तू बिलगावी ........ _amyaaaa

Life

Image

इतकच माझं आयुष्य उरावं ....

प्रेम, भावना, आपुलकी यात कधीच दूजाभाव नसावं प्रेम एवढं करावं कि ते आयुष्यभर पुरावं.... आयुष्याचा खडतर प्रवासात साथ नेहमी तूच असावं साउली बनून मी उन्हात माझ्यामध्ये तू विसावं.... लागताच तहान मला शीतल झरा बनून तू तहान भागवावं आणि मग मी तुला प्रेमाने मिठीत घ्यावं.... लागताच ठेच मला तू पटकन धावत यावं चुकून कधी अश्रू आले तर मी तुला हसवावं.... भासताच गरज मला तू सर्वात आधी हजार व्हावं बघताच मन माझं तुला टकमक पाहावं.... कळत नाही कि आपल्या प्रेमा बद्दल आणखी काय लिहावं लिहिण्यासारखं खूप आहे पण ते तुला कस कळावं.... कळत नाही एवढं आयुष्य मी एकट्याने कस काढावं तू नाही आहेस सोबत तर मी कस जगावं.... शेवटी इच्छा एकच आहे.... मरण कधी आलं तर तुझं येण्यापर्यंत ते टळावं कारण माझा शेवटचा श्वास अन तुझी घट्ट मिठी इतकच माझं आयुष्य उरावं ....

प्रेम तुझ माझ

प्रेम तुझ माझ प्रेम तू केलं प्रेम मी ही केलं भावना तुझा कळल्या, भावना माझा ही कळल्या विचार तुझे जुळले, विचार माझे हे जुळले मन तुझं गुंतलं, मन माझं ही गुंतलं..... प्रश्ण प्रेमाचा होता, नितांत प्रेम करणाऱ्या दोन मनांचा होता सुखाची झेप घेणाऱ्या स्वप्नांचा होता आयुष्यातल्या सुखदुःखाचा सोबतीचा होता..... हृदयापासून त्याची स्पंदन कधी वेगळी न्हवतीच तसच झालेल्या प्रेमाची साथ त्यांनी कधी सोडली न्हवतीच..... घडलं काही वेगळच.... प्रेम होत दोघांचं मात्र आक्षेप जगाचा जगायचं होत दोघांना मात्र विभिन्न अशा वाटा रस्ते प्रेमाचे दुरावले, कारणीभूत फक्त तुम्ही खूप प्रेम होत आमचं, हाच गुन्हा केला आम्ही..... शेवटी मात्र एक खार..... रस्ते जरी वेगळे असले तरी प्रेम हे असच राहील त्यानेच बनवलं हे प्रेम त्याला देव तरी काय करील जीव खूप अडकलाय एकमेकात त्याला आम्ही तरी काय करू म्हणून होप सोडले नाहीत देवा आम्ही नक्कीच continue करू ......