अशीच तू यावी अशीच तू यावी देऊन सर्व आठवणी मिठीत तू बिलगावी पहिले त्या स्वप्नी तुझाच ध्यास मणी ओघळताच अश्रू नयनी ना असे आस पास कोणी दूर ते क्षण झाले कष्ट खूप हृदयातले ना कोणास उमगले खरे प्रेम ते आपुले जगणे ते कसले ना तुझी ओढ तेथे प्रेम ते कसले ना तुझा उल्लेख तेथे एकदा तरी आयुष्यामध्ये तू .... मिळावी प्रेम त्या भावनांना पुन्हा एकदा कोमल पालवी फुटावी पुन्हा एकदा घट्ट हाताची मिठी व्हावी माथ्यावर प्रेमाचा स्पर्श आणि हृदयात काळजाची धकधक व्हावी अशीच तू यावी घेऊन सर्व आठवणी मिठीत तू बिलगावी ........ _amyaaaa