प्रेम तुझ माझ
प्रेम तुझ माझ प्रेम तू केलं प्रेम मी ही केलं भावना तुझा कळल्या, भावना माझा ही कळल्या विचार तुझे जुळले, विचार माझे हे जुळले मन तुझं गुंतलं, मन माझं ही गुंतलं..... प्रश्ण प्रेमाचा होता, नितांत प्रेम करणाऱ्या दोन मनांचा होता सुखाची झेप घेणाऱ्या स्वप्नांचा होता आयुष्यातल्या सुखदुःखाचा सोबतीचा होता..... हृदयापासून त्याची स्पंदन कधी वेगळी न्हवतीच तसच झालेल्या प्रेमाची साथ त्यांनी कधी सोडली न्हवतीच..... घडलं काही वेगळच.... प्रेम होत दोघांचं मात्र आक्षेप जगाचा जगायचं होत दोघांना मात्र विभिन्न अशा वाटा रस्ते प्रेमाचे दुरावले, कारणीभूत फक्त तुम्ही खूप प्रेम होत आमचं, हाच गुन्हा केला आम्ही..... शेवटी मात्र एक खार..... रस्ते जरी वेगळे असले तरी प्रेम हे असच राहील त्यानेच बनवलं हे प्रेम त्याला देव तरी काय करील जीव खूप अडकलाय एकमेकात त्याला आम्ही तरी काय करू म्हणून होप सोडले नाहीत देवा आम्ही नक्कीच continue करू ......